दीक्षाभूमीही एक्स्प्रेस रेल्वेगाडी लातूरमार्गे सोडल्यास प्रवाशांची सोय होणार असून त्यामुळे महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या पाच राज्यांची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. तशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे.
रेल्वे विभागाने लातूरहून पुणे-हैदराबाद बिदर-मुंबई या रेल्वेव्यतिरिक्त इतर राज्यांना जोडणारी कोणतीही रेल्वे आजपर्यंत सुरू केली नाही. गतवर्षी तर लातूरकरांच्या मागणीची रेल्वेमंत्र्यांनी दखलही घेतली नव्हती. रेल्वे मंत्रालयाला नवीन रेल्वे सुरू करणे शक्य नसले तरी काही रेल्वेचे मार्ग बदलल्यास प्रवाशांची सोय होऊ शकते.
दीक्षाभूमी एक्स्प्रेस (११०४५) ही रेल्वे कोल्हापूर ते धनबाद (बिहार) धावते. सध्या ती कोल्हापूर-पुणे-अहमदनगर-मनमाड-नांदेड-नागपूरमार्गे धनबादला...
more... जाते. ही रेल्वे कोल्हापूर-लातूर-नांदेड-नागपूरमार्गे धनबादला गेल्यास ४०० कि. मी. अंतरात बचत होणार असून सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड आदी जिल्ह्यांतील प्रवाशांची सोय होणार आहे. दीक्षाभूमी एक्स्प्रेसच्या मार्गावर नागपूर, जबलपूर, अलाहाबाद, वाराणसी, गया आणि कोळशाच्या खाणी असलेले शेवटचे ठिकाण धनबाद आहे. उत्तर प्रदेश, बिहार राज्यातील अनेक जण मराठवाड्यात व्यवसायासाठी कामधंद्यासाठी आले आहेत. तसेच या भागातील हिंदू धर्मीयांना काशी-वाराणसी येथे जाण्यासाठी तसेच बौद्ध धर्मीय अनुयायांना बुद्धगयाला जाण्यासाठी सोय होणार आहे.
please wait...Translate to EnglishWhen they launch the Deekshabhoomi Express train on the Latur route, it'll be very convenient for travelers and increase connectivity between Maharashtra, Telangana, Madhya Pradesh, Uttar Pradesh, and Bihar. Marathwada Railway Passengers' Association has requested Railway Minister Suresh Prabhu to do this. No railway has yet been started to connect Latur with Pune-Hyderabad, Bidar-Mumbai or any other state. Rail Ministry hasn't started a new railway yet, but if some routes change, it could become easier for travelers. Deekshabhoomi Express (11045) runs from Kolhapur to Dhanbad in Bihar. It currently goes through Kolhapur-Pune-Ahmednagar-Manmad-Nanded-Nagpur. If it goes through Kolhapur-Latur-Nanded-Nagpur, travelers will save 400 kilometers, and Solapur, Sangli, Usmanabad, Latur, and Beed residents will benefit. The Deekshabhoomi Express route also passes through Nagpur, Jabalpur, Allahabad, Varanasi, Gaya, and Kolasib.