रामटेक ते तुमसर रेल्वे मार्गाला मंजुरीची प्रतीक्षा
◆तुमसर, २१ ऑक्टोबर
तुमसर ते रामटेक हा नवीन रेल्वेमार्ग तयार करून या मार्गावर पॅसेंजर गाडी सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत होती. नागरिकांची मागणी लक्षात...
more... घेऊन रेल्वे प्रशासनाकडून पाच वर्षांपूर्वी रेल्वेमार्ग टाकण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. मात्र कालांतराने याकडे रेल्वे प्रशासन, लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने ही मागणी थंडबस्त्यात गेल्याने समाजसेवी संघटनांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
तुमसर ते रामटेक (नागपूर) हा रेल्वे मार्ग जोडल्यास ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. तालुक्यातील गायमुख, चांदपूर तीर्थक्षेत्र आणि अंबागड किल्ल्याच्या विकास कामाला गती मिळेल. त्यामुळे देशभरातील पर्यटकांना येथे येण्यासाठी नवा मार्ग मिळणार आहे. परिसरात अधिक पर्यटक आकर्षित होऊन नवीन रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. नवीन रेल्वे मार्ग टाकण्यासाठी परिसरातील लोकप्रतिनिधींनी अर्थपूर्ण प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळे सर्वसामान्यांना प्रवास करणे सोपे होणार आहे.
तुमसर ते रामटेक या नवीन मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने २०१६ साली सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे तुमसर रामटेक तालुक्यांना रेल्वे मार्गाने जोडण्याकरिता लोकप्रतिनिधींनी व रेल्वे प्रशासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
.......
Ramtek to Tumsar rail line awaiting approval
◆Tumsar, 21 October
There was a demand from the residents of the area to build a new railway line from Tumsar to Ramtek and start a passenger train on this line. Considering the demand of the citizens, the railway administration had ordered a survey to lay the railway line five years ago. However, due to the neglect of this demand by the railway administration and people's representatives, displeasure is being expressed in social service organizations.
Connecting the railway line from Tumsar to Ramtek (Nagpur) will boost the development of rural areas. The development work of Gaimukh, Chandpur pilgrimage and Ambagad fort in the taluka will be accelerated. So tourists from all over the country will get a new way to come here. The area will attract more tourists and create new employment opportunities. Local people's representatives should make meaningful efforts to lay new railway lines. So it will be easy for common people to travel.
The Ministry of Railways had ordered a survey in 2016 for the new line from Tumsar to Ramtek. But the local people's representatives did not pay attention to this. Therefore, citizens are demanding that the people's representatives and the railway administration should try to connect Tumsar Ramtek talukas by rail.