नागपूर-पुणे-नागपूर रद्द रेल्वे गाड्या सुरळीत करा
खासदारांनी वेधले रेल्वे मंत्र्यांचे लक्ष
वर्धा : पुणे येथून विदर्भातील सर्व जिल्ह्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्रवासी वर्ग दिवाळी सणानिमित्ताने प्रवास करीत असतात. मागील काही महिन्यांपासून पुणे-नागपूर दरम्यान...
more... जवळपास सर्व रेल्वे गाड्या वारंवार रद्द करण्यात येत आहे, तसेच एकमेव सुरू असलेली आझाद हिंद एक्सप्रेससुद्धा सरासरी पाच ते सहा तास दररोज उशिराने धावत आहे. ऐन सणासुदीच्या काळात उद्भवलेल्या या गंभीर समस्येबाबत खासदार रामदास तडस यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री यांना लेखी पत्र देऊन लक्ष वेधले आहे. मेगा ब्लॉकमुळे गाड्या रद्द होत आहेत, ही जरी वस्तुस्थिती असली तरी सुध्दा पुणे- नागपूर दरम्यान रेल्वे सेवा सुरू ठेवणे व त्याला पर्यायी मार्ग काढणे ही रेल्वे विभागाची प्राथमिकता असली पाहिजे. नागपूर-पुणे दरम्यान सर्व गाड्या सरसकट रद्द करण्यापेक्षा पर्यायी मार्गाने म्हणजेच पनवेल-कल्याण इगतपुरी-मनमाड मार्गे नागपूर-पुणे दरम्यानची वाहतूक वळविल्यास सरसकट गाड्या रद्द होणार नाही व प्रवासी वर्गाला देखील या दिवाळी दरम्यान मोठी सोय उपलब्ध होईल, असा प्रमुख सल्ला खासदार तडस यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे. पुणे-नागपूर दरम्यान प्रभावित झालेल्या रेल्वे सेवेची दखल घेणे अत्यंत गरजेचे होते व हा विषय मार्गी लावण्याकरिता प्रयत्न असतील, असे खा. रामदास तडस यावेळी लोकमतशी बोलताना सांगितले.
......
Normalize Nagpur-Pune-Nagpur canceled train trains
The MPs drew the attention of the Railway Minister
Wardha: A large number of students, traveling classes travel from Pune to all the districts of Vidarbha on the occasion of Diwali festival. Almost all trains between Pune and Nagpur have been frequently canceled for the past few months, and even the only running Azad Hind Express is running late by an average of five to six hours every day. MP Ramdas Tadas has written a letter to the Union Railway Minister to draw attention to this serious problem that has arisen during the festive season. Although it is a fact that the trains are being canceled due to the mega block, the priority of the railway department should be to continue the train service between Pune-Nagpur and to find an alternative route. Instead of canceling all the trains between Nagpur-Pune outright, if the traffic between Nagpur-Pune is diverted through Panvel-Kalyan-Igatpuri-Manmad, the trains will not be canceled outright and the passengers will also get great convenience during this Diwali. is given It is very important to take note of the affected train service between Pune-Nagpur and efforts will be made to sort out this issue. Ramdas Tadas said this while talking to Lokmat.