तिरोडी - इतवारी रेल्वे गाडी सुरु; प्रवाशांना दिलासा
■ भारतीय यात्री केंद्र समितीला यश
तुमसर : कोरोना काळात निर्बंध असल्यामुळे शिवाय कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये त्यामुळे सतत अडीच वर्षांपासून तिरोडी - इतवारी...
more... रेल्वे गाडी बंद होती. त्यामध्ये रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे बेहाल होत होते. तुमसर तालुक्यातील व मध्यप्रदेशातील नागपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवासाकरीता ही रेल्वे सोयीची होती. बंद असलेल्या तिरोडी ते इतवारी रेल्वे सुरु व्हावी याच्या प्रतिक्षेत प्रवासी होते. अखेर तिरोडी ते इतवारी रेल्वे नियमित सुरु करावी, याकरीता भारतीय यात्री केंद्र समितीच्या प्रयत्नांना यश आले आहे. सोमवार दि. १७ ऑक्टोबर २०२२ रोजी सुरु झालेल्या तिरोडी-इतवारी रेल्वेला तुमसर टाऊनला समितीच्या सदस्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले.
मध्यंतराच्या काळात अगोदर तुमसर ते तिरोडी रुळावर दोन वर्ष रेल्वे गाड्या धावल्या नव्हत्या. कोरोना संपुष्टात आला असला तरी रेल्वे बोर्डाने बंद पडलेल्या रेल्वे गाड्या सुरु करण्यासंबंधी जरासाही विचार केला नव्हता. सर्व सुरळीत व्यापार व जनतेचे आवागमन पूर्वपदावर सुरु झाले. तुमसर टाऊन येथून नागपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांची फार गैरसोय होत होती. त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचे बरेच नुकसान होत होते. वेळेच्या आत अनेकांना सेवा उपलब्ध होत नव्हती. तिरोडी व नागपूरला जाणाऱ्या व्यवसायिकांना साधने नव्हती. त्यात अनेकांचे व्यवसाय बुडाले. लहान-मोठ्या व्यावसायिकांच्या दृष्टिने अत्यंत उपयोगी ही रेल्वे होती. या सर्वांचा विचार करुन भारतीय यात्री केंद्र समिती सदस्य प्रभाकर नायडू, सिताराम जोशी, सुरेश वेलुरकर व लिलाधर वाडीभस्मे आणि बेनीराम खंडेलवाल, मधूबाबू सांभारे यांनी मध्यप्रदेश राज्याचे बालाघाटचे खासदार ढालसिंग बिसेन व रेल मंत्र्याकडे सदर विषया संबंधित रेटा धरुन लावला. अगोदर दि. २१ मार्चला तुमसर- तिरोडी सुरु करण्यात आली. नंतर सतत सहा महिन्यांपासून तिरोडी ते तवारी पॅसेंजर रेल नियमित नियमित सुरु करण्यासंबंधीत पाठपुरावा करता - करता अखेर तिरोडी ते इतवारी सुरु करण्याच्या निर्णयाला रेल्वे बोर्डाने हिरवी झेंडी दिली. मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यातील प्रवाशी प्रतिक्षा संपली. अन् सोमवार दि. १७ ऑक्टोबर पासून रेल्वे गाडी सुरु झाल्याने प्रवाशांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसून येत होता. भारतीय यात्री केंद्र समिती लॉयन्स भारतीय यात्री केंद्र लॉयन्स क्लब व्यापारी असोसिएशन, ललीतम क्लब भंडारा जिल्हा ग्रामस्वराज्य मंडळ या संपूर्ण संघठनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. तिरोडी ते इतवारी रेल्वे तुमसर टाऊन येथे ८.४५ वाजता सदर रेल्वेच्या इंजिनचे पूजन करुन झेंडी माजी खा. मधुकर हिरवी झेंडी माजी खा. मधुकर कुकडे, भारतीय यात्री केंद्र समितीचे पदाधिकारी सिताराम जोशी, लिलाधन वाडीभस्मे, , दिनेश नागपोता, अरुण (टाटा) लांजेवार, संदीप पेठे, किशोर चौधरी, आशिष कुकडे, खुशाल बुरडे, व नवनित जोशी आणि मनिष जोशी, अशोक कुकडे व गणमान्य मंडळी प्रामुख्याने हजर होते. तिरोडी ते इतवारी रेल्वे सुरु झाल्याने तुमसर टाऊनला प्रवाशांची बरीच गर्दी होती. लोको पायलट प्रविण खडके, सहाय्यक लोको पायलट करण तांडेकर, लोको निरीक्षक आर. के. वर्मा, गार्ड कोलमेथी यांचा पुष्पगुच्छ व हार चढवून स्वागत करण्यात आले.
सदर रेल्वे सुरु झाली. त्या प्रित्यर्थ तुमसर टाऊन येथे प्रवास करणाऱ्यांचे पेढे वाटून तोंड गोड करण्यात आले. (वि.प्र.)