KR ne Kal Bina Kisi Notice ke Block Liya Thha
रत्नागिरी : महाड तालुक्यातल्या करंजाडीजवळ सिग्नल यंत्रणेतल्या बिघाडामुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
रेल्वे रखडली असली तरी, कोकण रेल्वे प्रशासनाकडून याबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही. काल संध्याकाळपासून कोकण रेल्वे मार्गावरील तांत्रिक बिघाडांमुळे कोकण रेल्वे धिम्या गतीनं धावत आहे....
more...
यादिरंगाईमुळे रेल्वेगाड्या 6 ते 7 तास उशिराने धावत आहेत. सहाजिकच गावाकडे निघालेल्या आणि निघणाऱ्या चाकरमान्यांची यामुळे मोठी अडचण झाली आहे.
कोणतीही पूर्वसूचना दिलेली नसताना दुरूस्तीचं काम काढल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. दोन दिवसांपासून कोकण रेल्वेवर ओढावलेलं विघ्नं अजूनही टळताना दिसत नाही. मात्र यात भरडला जातोय तो कोकणी माणूस.
कोकणात जाण्यासाठी मुंबईच्या सीएसटी रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी गर्दी केली आहे. मात्र कोकण रेल्वे विस्कळीत झाल्यानं प्रवाशांवर रेल्वे स्थानकातच बसून रात्र काढण्याची वेळ आली. रेल्वेकडून कोणतीही सूचना न दिल्यानं प्रवाशी संतप्त झाले आहेत.