तुमसर रेल्वे स्थानकात तिरोडी इतवारी पॅसेंजरचे स्वागत
भारतीय यात्री केंद्र समितीच्या प्रयत्नाला यश
तुमसर : अडीच वर्षांपासून बंद असलेली तिरोडी इतवारी पॅसेंजर रेल्वे अखेर सुरू झाली. मंगळवारी तुमसर रेल्वे स्थानकात पॅसेंजर आली असता...
more... स्वागत करण्यात आले. भारतीय यात्री केंद्र समितीच्या प्रयत्नाला यश आल्याने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी माजी खासदार मधुकर कुकडे, भारतीय यात्री केंद्र समितीचे सदस्य सीताराम जोशी, लीलाधर वाडीभस्मे, दिनेश नागापोता, अरुण लांजेवार, संदीप पेठे, किशोर चौधरी, आशिष कुकडे, खुशाल बुरडे, नवनीत जोशी, मनोज जोशी, अशोक कुकडे यांनी इंजिनचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले.
तिरोडी ते इतवारी पॅसेंजर सुरू व्हावी यासाठी भारतीय यात्री केंद्र समिती सदस्य प्रभाकर नायडू, सीताराम जोशी, सुरेश बेलूरकर, लीलाधर वाडी भस्मे, बेनीराम खंडेलवाल, मधुकर सांभारे यांनी बालाघाटचे खासदार ढालसिंग बिसेन यांना निवेदन दिले होते.
यापूर्वी तुमसर तिरोडी ही प्रवासी गाडी २१ मार्चला सुरू करण्यात आली होती. परंतु ते तिरोडी ते इतवारी पॅसेंजर बंद होती. त्यानंतर १७ ऑक्टोबर पासून रेल्वे प्रशासनाने तिरोडी ते इतवारी दरम्यान प्रवासी रेल्वे गाडी सुरू करण्याचे आदेश दिले.
यावेळी यात्री केंद्र समितीचे पदाधिकाऱ्यांनी लोको पायलट प्रवीण खडके, सहायक लोको पायलट करण दांडेकर, लोको निरीक्षक आर. के. वर्मा, गार्ड कोल मेथी यांचे स्वागत केले. यात्री केंद्र समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व तुमसर स्थानकावर उपस्थितांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला.